शहिद दिवस ✍️
शहिद दिवस
जुलमी इंग्रज राजवट
राहतं कंठत गुलामीत
जागे झाली तरुण
स्वातंत्र्य वात पेटवत.
सळसळ होते रक्त
उभारला लढा स्वातंत्राचा
गाजवले शोर्य वीरांनी
जप जहाल मंत्राचा.
भगत सिंग सुखदेव थापर
शिवराम राजगुरू क्रांतिकारी
विचार यांची भारी
तरुण वाटतं अवतारी.
पकडले गेले क्रांतिकारी
सुनावली त्यांना फाशी
हसत गात फासावर
लाहोर पाकिस्तान देशी.
दिवस होता हाच
व्यथा भारतीयांना झाल्या
गाथा लिहल्या गेल्या
माता धन्य झाल्या.
सलामी देऊ वीरांना
सांगु चोहीकडे वाऱ्यांना
गेलेत इंग्रज देशातून
सांगु लोकशाही त्यांना.©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा.जळगाव
मो. 9922239055
.webp)

Comments
Post a Comment