भागवत एकादशी ✍️
भागवत एकादशी
कुणी सांगी मोक्ष! कुणी भागवत!
करी जप व्रत! पुण्यफळ!!1
नाम नाना तरी! पूजा सारी तारी!
हरी नाम भारी! भजनात !!2
घेतं वारकरी! टाळ वीणा सारी!
मुदूंग वाजीत! मनोभावे !!3
लाभ पुण्य फळ! पोटा पडे खळ!
उपवास कळ! एकादशी!!4
सर्वांचा हिशोब!येथेच होतोच!
सारं पाहतोच! पांडुरंग!!5
साकळे निर्मळ! पावतो श्रीरंग!
भक्ती लिन दंग! वारकरी!!6
दीन दुःखी जाण! देत हात त्याना!
सुफळ ते यांना! मिळतेच!!7
काम कर्ता कर्ता! नाम मुखी ठेवु!
विष्णु साथ राहु ! सदोदित!!8
व्रत एकादशी! भाव हा अंतरी!
निर्मिती अभंगी! प्रदिपची!!9 ©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव.

Comments
Post a Comment