नामस्मरण ✍️
नामस्मरण
स्मरण करितों! सदैव सर्वदा!
राही जरी साधा! माणसात!!1
जळी स्थळी बघी! समजून वागी!
सुखी तीच जगी! नामघेत!!2
तूझं नाम मुखी! नसे कधी दुःखी!
प्रभु करी सुखी! लेकरांना !!3
नाम असे साथी! घेतं काम हाती !
करी जरी शेती! शेतकरी!!4
दान पुण्य कर्म! जाणुन ते वर्म!
पाळत स्व धर्म! जनतेत!!5
राम राम करी! हात तोचि जोडी!
जया असे गोडी! प्रभुनाम !!6
सदा कदा दिसें! सृष्टी तोचि वसे!
ध्यान नाम बसे! स्मरणात!!7
हरी नाम तारी! देत तो भाकरी!
जरी निर्माण कारी! सर्वदूर!!8
प्रदीप सांगतो ! करूयात भक्ती!
प्रभु नाम शक्ति! तारतेच!!9
©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment