व्यथा स्रियांच्या ✍️
मन काव्य श्लोक .
माणसा माणसा काय तु केले
स्त्री रत्न तु गर्भात चिरडून टाकले.
गर्भ चाचणी उपाय शोधले
नारी जीवन येण्या अगोदरच संपवून टाकले.
मादी संख्या जास्तीची ती परवडते तुला कसे नं उमगले.
नर फक्त वाढवत गेले मादी कुस्करत गेले.
विषम अंक सारे जाहली अन्याय अत्याचार तिच्यावर वाढवून दिले.
लाचार तिला केले भोग वस्तु म्हणून पाहत गेले.
लहान असो व मोठी तिच्यावर गाजवत गेले.
गुणी कितीही असो वा उंच भरारी घेणारी असो करारी कितीही असो.
तिच्याकडे कडे भोगवस्तु म्हणून पाहतच गेले.
अनमोल रत्नाचे अवमूल्यन तुच केले.
विश्वातील साऱ्या माता बघिणी संबोधण कारे तु सोडुन दिले.
नातं पवित्र शक्ति आदिमाया रूप तिचं विसरून गेले.
माणसा माणसा काय तु केले स्त्री रत्न गर्भात चिरडून टाकले.©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर तालुका चोपडा
जिल्हा. जळगाव.

Comments
Post a Comment