जगदंबा ✍️
जगदंबा
आदिमाया शक्ति! तिचा अवतार!
उत्पती हो फार! जीवांचीच!!
माय माया शक्ति! तिचीच हो भक्ती!
देत जिवा मुक्ती! आदिमाया!!
सांभाळ करिते! रक्षक बनते!
दृष्ट ते तोडते! ती कालिका!!
सत्य तिचे बोल! टिकवे ती प्रत !
एकनिष्ठ व्रत!प्रतिव्रता !!
एकीत ठेवते! मायेत जोडते!
कान ती पिळते! आई वाटे !!
दळून ते धान्य!शिजवे ती अन्न!
देई ती मिष्टांनं !अन्नपूर्णा!!
हाकेला उत्तर! चालवत वार!
दृष्ट त्या संहार! जगदंब!!
दिली तलवार! देऊन संकेत!
दृष्ट ती कापत! मां भवानी!!
आई ते मुलगी! आजी आणि पत्नी!
सर्व नात्यांतनी! श्री ती शक्ति!!
रूप ते वेगळे! एकच सगळे!
स्वरूप आगळे!नऊदुर्गा !!
सांगे तो प्रदीप!अभंग स्वरूप!
त्यातून प्रारूप! लेखणीत!!©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment