काव्यातून परिचय ✍️
"लेखणीतून परिचय "
सातपुडा पायथ्याशी
गाव माझं गणपूर
हुशार मी भरपूर
पोहचलो सर्वदूर.
सत्य घेत मी हा वसा
उमटवला हो ठसा
विविध क्षेत्र पादाक्रांत
चर्चा हो भारत देशा.
पद भूषवली खुप
राजकीय ते स्वरूप
भ्रष्ट्राचार केला नाही
तेच माझं हो प्रारूप.
बाबा समाज सेवक
दिशा दाखवली गावा
त्या विविध संस्था ठेवा
उभ्या गणपूर गावा.
सेवा भाव तो अंगात
दिसें जगाला कामात
शांत संयमी स्वभाव
वागणं असे प्रेमात.
साधा राही पेहराव
शेतकरी कष्टकरी
संसार त्यातून चाले
राबणं मज पदरी.
दृष्ट भ्रष्ट सरकार
घेतली शेती आमची
दिली नाही हो नोकरी
शेती आली कायमची.
राजकारण लेखक
कवी झालो पत्रकार
लेखणीतून प्रहार
शब्ददिप ब्लॉग सार.
स्व प्रकाशन काढले
नित्य लिहणं वाढले
माणसं जगी जोडले
दृष्ट सारीच तोडले.
अल्प यात परिचय
सत्य नीती हि संचय
यातना त्या सोसतोय
लेखणीत मांडतोय .
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर तालुका चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment