दैवत आई वडील ✍️
आई वडील दैवत.
आई वडील दैवत!त्यांचं घेत व्रत!
देत घरी साथ! संसारात!!1
देह दिला त्यांनी! शिक्षण संस्कार!
सांगत ते सार! जीवनाचा!!2
नीती धर्म कर्म ! भरलेत वारे!
सद्विचार सारे! शिक्षणात!!3
त्यांच्यातून आलो! आई गर्भ वाढ!
सोसत ते कळ! निर्मितीत!!4
रक्तातुन दुध! निर्मित ते दिले!
संगोपन केले ! बालपणी!!5
हागणं मुतने! सहन केलेत!
आनंदी झालेत! वाढवता!!6
समज शिक्षण! सारं कष्ट त्रास!
घेत स्व जीवास! मजसाठी!!7
थोडी संधी दिली! ऋण फेडण्याची!
आठवण त्यांची!साठलेली!!8
प्रथम दैवत! आई वडील हे!
सांगे प्रदीप हा!मुलगाच!!9©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर तालुका चोपडा
जिल्हा. जळगाव.


Comments
Post a Comment