महामानवाची गौरव गाथा ✍️
महामानवाची गौरव गाथा
डॉ बाबा साहेब! परदेशी गेले!
नाव कमविले! स्वदेशाचे!!1
उच्च त्यांचे ज्ञान! लिही संविधान!
कायदा सन्मान! शिकवला!!2
रूढी परंपरा! काही त्या अनिष्ट!
संम्पवण्या कष्ट! घेतलेत!!3
दीन दलितांचा! वाली भीमराव!
सर्व देत भाव! भारतात!!4
खोललं मंदिर! रुजव समता!
विश्वात बधुता! शिकवण!!5
हक्क मान स्त्रीला! त्यांनी सांगितला!
कायदा तो झाला ! या देशात!!6
मिटल्या त्या जाती! जनता हि भारी !
सारी अंगिकारी ! समानता!!7
शिकेल टिकेल! संदेश रुजला!
पाया तो रचीला ! शिक्षणाचा!!8
गाथा ग्रन्थ खुप! साहित्य लिहलं!
ज्ञानातून दिलं! समाजाला!!9©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर तालुका चोपडा
जिल्हा. जळगाव.


Comments
Post a Comment