वाट पावसाची ✍️
!! वाट पावसाची!!
किती ओर्बाडतोय तुला हा वारा
चिंब करताय ह्या पाऊस धारा
हळू हळू चाल तुझी मंद जरा
केस मोकळी संगे त्या साजधारा
पदर ओढतोय खट्याळ वारा
ढळतोय तोल चाल मंद करा
सापडलीस त्याच धुम चक्रीत
सावर नको घडु देऊ विपरीत
वाट अवघड झाली पावसात
मदतीला कोण संगतीत साथ
घाठायचा पल्ला तुला एकटीला
पार कर अवेळी अडथळ्याला
कडकडतेय तूझ्या मदतीला
प्रकाश तिचाच तुला संगतीला.©️®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055


Comments
Post a Comment