ऊस ✍️
!!ऊस!!
ऊस उंच हो मळ्यात वाढला
पाणी देतोय त्याला वेळेला!!
लावलाय औदा त्याला सुरुचा
टिपऱ झालीय त्यांची पेरूची
हिरव्या पानांचा शेंडा त्याचा
खाताय ना जरा ऊस गोडाईचा!
पेरा मंधी भरली साखर
गोड लई त्याचा गर
जरा जपुन जाऊ रानाला
खाताय ना जरा ऊस गोडाईचा!
सोपा तुमचा ऊस सोलायला
तोंडाला लागली चव चाखायला
लळा लागलाय त्याला चाखायचा
खाताय ना जरा ऊस गोडाईचा.
पाहुन शेत हृदय लागलं भरायला
औदा मन लागलं हसायला
उंची त्याची लागली दिसायला
खाताय ना जरा ऊस गोडाईचा.
भरलाय भारी लांब टिपऱ्यात
जोमदार आलाय खताचा गुण
सर पाण्यानं ठेवलीय भरून
खाताय ना जरा ऊस गोडाईचा.
तुमच्या ऊसाची कीर्ती खुप
रान पाहुन चढला हुरूप
खायला आली मी दुरून
खाताय ना जरा ऊस गोडाईचा.
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment