उनाडवारा ✍️



!!उनाडवारा!!


पावसात झोंबतो उनाड वारा 

वरून सुटल्या थंड जल धारा 


दोघं छेड काढतात आज जरा 

ओढी पदर दुसरा करी गार 


झपझप मी हो धरतेय चाल 

करताय दोघं मला हो बेहाल 


पाझरतंय शरीर जल धार

वारा करतोय अंगभर वार


साडी केस उडवी अंग बडवी

धुंद करी मन प्रेमात बुडवी


गाठ गं सोडली रेशमी साडीची 

सोन परी मी पिवळी हळदीची 


तुटून पडला उनाड पाऊस

वारा फेडतोय हो सारी हाऊस


तृप्त मन करी त्रास त्यांचा आज 

पडताय मंद पावलं गं आज 


काय होतंय काय छेडलं त्यानं

बेधुंद ते झालं शहारलं मनं .©️®️


प्रदीप मनोहर पाटील 

गणपूर चोपडा 

जिल्हा. जळगाव.

मो. 9922239055


Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे