बाबास पत्र ✍️ पत्रलेखन.

!!पत्रलेखन!!


दिनांक :- 15/06/2025 

वार:- रविवार

विषय:- " बाबास पत्र"

 

 आदरणीय. कै. नानासो. 

                नाना आज आपण आमच्यात नाहीत. मला आज आपणास पत्र पाठववावं असं वाटलं म्हणून व्यक्त होतोय .नुसतं कागद हातात घेतला अन आपल्या साऱ्या मला आठवतं असलेल्या जुन्या साऱ्या आठवणी मनात आल्या.डोळे भरून आले. डोळ्यात अश्रू येऊ लागले मन गहिवरून गेलं. आपण गेला एक मोठा मुलगा म्हणून जबाबदारी टाकून गेला. जातांना शेवटी अगदी शेवटच्या क्षणाला आपल्या डोळ्यात अश्रु मला दिसतं होते. डोळ्यात अश्रु थेंब पडतांना नकळत सांगतं असावेत . काय करू प्रदीप अचानक जावं लागतंय. तुम्ही लहान असतांना सोडुन जातोय हेच भाव तुमच्या मनात असली पाहिजेत. काळाने घाव घातला. लवकर पहाटे पहाटे ब्रेन ह्यामरेज चा ऍट्याक आला.चार दिवस सुप्त बेशुद्ध अवस्थेत होता.त्या वेळी लोकं म्हणायची गेल्यात जमा आहे. मी आई देवाच्या धावा करतं उशी जवळ बसलेलो असायचो. देवाने आमचं आयकले. अन हळूच तुमची बोटं हलली नंन्तर थोडी शुद्ध आली हळूच हात हलला. मग डॉ उपचार जोरात सुरु झाले.एक महिनाभर दवाखान्यात होता. खुप खर्च झाला आपला. पण आपण परत आला अन नवं उभारी मिळाली. त्यातून सावरत असतांना परत.वर्ष भर नंन्तर काळ आला अन घेऊन गेला त्यात चुक आमची पण असु शकते. आपण आजारी आम्ही लहान मी पाहिलं मला शाळेत जाण्यासाठी पास काढण्यासाठी पैसे हवे होते. आपल्या पण गोळया संपल्या होत्या. पण आपण माझ्या पास साठी पैसे दे असं आईला सांगितलं. गोळया नंन्तर मागवल्या जातील. त्यांचं शिक्षण महत्वाचं. असं सांगणारे आपण. तेथेच चुक झाली असावी असं वाटतं. जे तुम्ही वागलात तसंच सर्व बाप वागत असतील नाना. एकदा लहान असतांना गावा जवळ धरण बांधने सुरु असतांना तेथे कार्यक्रम होता रात्री. तुम्ही नाही म्हणतं होता. माझा हट्ट होता येईल. हट्ट पुरवण्या साठी मला एका खांद्यावर बसवून पाच सहा km. पायी रात्री कार्यक्रम ला घेऊन गेला. इतकं मला आठवतं. जातांनाच झोपलो असेल.कसला कार्यक्रम बघितला नाही. लहान वय कळतं नव्हतं पण त्रास दिला आपणास. हट्ट आपणही पुरवत होता.कष्ट करतं होता. शेतात एकदा दुपारी पायी आपली भाकरी घेऊन आलो होतो. तर आपण चिडला होता. भर उन्हात कश्याला आला इतक्या लांब. पुन्हा कधी येऊ नको उन्हात असं सांगणारे आपण. अशी अनेक प्रसंग आठवणी आहेत आपल्या. पण दाटून येतं. ते अजाण लहानपण माझं समजतं नव्हतं आपलं दुःख. आपण स्वतः उन्हात घाम गाळत होता. अन मला ऊन लागु नये म्हणून काळजी घेत होता. असं कसलं काळीज होतं आपलं तीळ तीळ तुटतं होतं आमच्या साठी तुमचं अन आम्हाला समजतं नव्हतं. शेवटी मी म्हणेल आपण बाप होता सृष्टी दाखविता होता.देव आहात होता अन राहणार माझ्यासाठी. उपकार अंनत आहेत. कसं फेडू समजतं नाही. नुसतं वर्ष्यातून एकदा तुमच्या नावानं तुमी जेवायला येणार म्हणून श्राद्ध करतो. मी आठवतं असतो सदैव जे आपणास समजतं असेलच. तुमी वर जाऊन सुद्धा. मला अनुभव आलाय तोही. लहान भावाचा तिकडं गाडी अपघात झाला. इकडे मला स्वप्न पडतं "अरे प्रदीप अनिल ला काय झालं बघ पण मी आहे "मी आहे असं सांगणारे तुम्ही नाना मला हवे होता. त्याला त्या अपघातात खरचटलं सुद्धा नाही काय तुमचं लक्ष वरून सुद्धा. असो सांगण्या लिहण्या सारखं खुप आहे नाना.पण थांबतो. आपलं गोपनीय मनातलं भाव सार्वजनिक करतं पत्र इतरांना वाचण्यास पाठवायचंय.म्हणून कमीत कमी व्यक्त होतं आहे क्षमा असावी चुकलंच तर माफी देतं जा मी व माझ्याकुटुंब पाठीशी सदैव राहा अशीच सदभावना व्यक्त करतो अन पत्र संम्पवतो.आपल्याआशीर्वादाने. धन धान्य,सुख शांती, समृद्धी, आरोग्य आम्हाला मिळो अन आपल्याला सदगती प्राप्त होवो. ""माझा नाना देव माझा"" सदैव सोबत राहा.©️®️


तुमचा मुलगा 

प्रदीप मनोहर पाटील 

गणपूर चोपडा 

जिल्हा. जळगाव.

मो. 9922239055


Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे