भक्त पुंडलिक ✍️
!! भक्त पुडलिक!!
सेवा करी भक्त ! आई वडिलांची!
भक्ती बघा त्यांची! जीवनात!!
माता पिता देव ! भाव हाच ठेव!
शिकवण राव ! तीच असे!!
फेकली हो वीट! बोलून ते धीट!
थांबा जरा नीट ! विटेवरी!!
सेवा करतोय! निर्मित्यांची बघा!
देतोय ना जागा ! चरणाशी!!
प्रसन्न झाला हो! देव पांडुरंग!
झाला तोही दंग! बघण्यात!!
सदैव आठवे ! भक्तांना प्रसंग!
सांगे तो श्रीरंग! कथे मध्ये!!
बोध घेऊ आता! पुजु माता पिता!
येईल तो स्वतः! भेटायला!!
गुण सांगायला ! लागतील लोकं!
लाखात हो एक ! देवरूप!!
हाच सांगे सार ! प्रदीप यातून!
ह्या जीवनातून ! अभंगात!!©️®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव.
मो. 9922239055


Comments
Post a Comment