साथ तुझी ✍️
रिम झिम जल धारा
गार गार छान वारा
आनंदात नाचु जरा
साथ संग तुझा खरा .
चिंब होतेय धरणी
सारी पाऊस करणी
फेर हा दोघं मिळूनी
साजरा नाच नाचूनी.
मृग धारा बरसल्या
गधं सुटला धरणी
करू बीज हो पेरणी
येईल पीक बहरुनी.
आनंद झाला मनातुनी
तुप्त होऊ आता दोघे
यौवन धग सारी जागे
सृष्टी संग मन लागे.
चिंब गं भिजुनी नाचु
ढग गं लागले बोलु
ताल सुर ते जुळवू
गाणं आपलं खुलवू.
निसर्ग सुदंर पाहु
सुख शांती ती मिळवु
क्षण आज छान भोगु
ताल सुर हो जुळवू.©️®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव.
मो. 9922239055


Comments
Post a Comment