वारी अभंग ✍️
!! वारी अभंग!!
देव घरोघरी ! रोज पूजतात!
वारीला जातात ! वारकरी!!
गळ्यात तुळशी ! करून ती माळ!
हातात चिपाळ ! मुखी नाम!
विठ्ठल विठ्ठल ! सोबती ते दंग!
भरतात रंग ! चालतांना !!
हातात पताका ! गातात ते स्वता!
टाळ वीणा घेता ! भजनात !!
वाजत गाजत ! रमत गमत!
होई एकमत ! रिंगणात!!
पाहुन सोहळा ! भक्तीचा हा मेळा!
होई तोहि वेडा! देवभोळा!!
गजर सदैव ! माऊली माऊली!
पडते सावली! सुखाचीच!!
वाट हि वारीची ! पावसा पाण्यात!
नाचून गाण्यात! आनंदात!!
होतात तल्लीन ! भक्त गण सारी!
प्रदीप तो भारी! सांगे कथा !!©️®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव.
मो. 9922239055


Comments
Post a Comment