पहिला पाऊस क्र 1✍️
!!पहिला पाऊस!! क्र. 1
वारा सुटला सुसाट पडली ढगांशी गाठ
विजांचा झाला लखलखाट सारा वरती थाट
ध्वनी गुंज कडकडाट जीवास घबराट
खोप्यात साऱ्यांनी धरली आपली वाट
उधळी फुटली पंख मंदिरात वाजे शंख
जलधारेत भिजू लागले राजा आणि रंक
नवं चैतंन्य आलं धरती बीज वाट वरती
नदी नाले खळखळ करती धबधबे ओसंडून वाहती
हलचाल झाली ढग सारी जलधारी
भुवरी नवं निर्माण तयारी सुरवात खरी
ब्रम्हांड सारं चक्र सृष्टी निर्मिती सत्र
पाऊस हेच खरं जीव जन्म जीवन सूत्र.
माता भु कक्षा ग्रह करता सुरक्षा
ग्रहांची किमया सृष्टी जीव तत्व घाठता निर्माण कक्षा
©️®️
प्रदीप पाटील
गणपूर ता.चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment