तुझ्या साठी मी सजले ✍️ लावणी माझी क्र 2
तुझ्या साठी सजले.
लावणी माझी क्र 2
तूझ्या साठी सजले राया आज तूझ्या साठी सजले
एक एक फुलं अलगद तोडले राया अलगद तोडले
सुगन्ध त्यांचा भरला मनात राया सुगधं त्यांचा भरला मनात
त्या गंधाने मी मोहरले राया मी मोहरले
मोहित होऊन तूझ्या साठी राया त्या फुलांना मीच माळले
सांग तूझ्या साठी गजरा कसा दिसतो राया कसा दिसतो राया
या सुगधा सारखं आपलं पसरू दे प्रेम राया पसरू दे प्रेम
लवकर ये राया लवकर ये
वाट पाहतेय मी माळून गजरा आज माळून गजरा
आज करूयात साजरा आपला प्रेम दिवस आज करूयात साजरा
येताच घे मला कवेत राया घे मला कवेत
असंच एकरूप होऊ आपण एकरूप होऊ आपण एकरूप होऊ
पसरू दे आपला सुगधं राया पसरू दे सुगन्ध
येऊ दे आवाज आपला येऊ दे आवाज प्रेमाचा येऊ दे आवाज आपुला राया
आज तृप्त कर राया तृप्त कर राया मला तृप्त कर
कधी रे येशील राया
कधी रे येशील
आज मी सजलीय तूझ्या साठी राया तुझ्या साठी सजलीय
सांग राया माझं मन माझं भराया कधी रे येशील राया कधी येशील
तृप्त कर मला तृप्त कर राया ये लवकर ये लवकर राया ये लवकर तृप्त कर तृप्त कर.
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment