बहरलं रान. क्र. 2✍️



!! बहरलं रान!!क्र. 2


शेत झालंय हिरवं 

वाटे नवीन हे पर्व

सुखी होऊ आता सारे

राबता कुटुंब सर्व.


पाऊस येतोय धो धो

खर्च पालटे हो रूप

खत नींदनी बियाणं

वाढतंय देणं खूप.


आशेवर शेतकरी

कष्ट करतं मरतो

सरकार भीक देतो

काळ असाच सरतो.


पोट हो भरणाऱ्याला 

किंमत नाही उरली

गरज त्याची सरली

अमाप कणसं आली.


धान्य ठेवायचं कुठं

चिंता राज्याला पडली 

म्हणून शेतकऱ्यांना 

मारा धोरण ठरली.


मिलावट बाजारात

शेतकरी हो बेजार 

मरणाचं त्याला दार

उघडं त्याचं सताड.©️®️


प्रदिप पाटील

गणपूर जिल्हा. जळगाव

मो. 9922239055


Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे