बहरलं रान. क्र. 3✍️

 


!!बहरलं रान!!क्र 3


झालं हिरवं हो रान 

पिक दिसतंय छान 

पावसात बहरले

सांभाळतो तो कमान.


पांढरं सोनं सांगतं

कीड येतेय रांगत

त्यांचीचं होते पंगत

किडिंची येई रंगत.


पिकून येतंच खूप

पालटतं सारं रूप

जातं कवडी मोल

मावळतो हा हुरूप.


नेते व्यापारी सारे

होतात ते मालामाल

शेतकरी ते बेहाल

सुकले त्यांचीच गाल.


पिकवणारे दुबळे 

मजा मारता सगळे 

ओरबाडता बगडे 

हिरवळ चोहीकडे.


व्यथा झाल्या कथा आल्या

तरी नाही हो कळल्या

सरकार दरबारी

थैल्या साऱ्यांच्या भरल्या.


प्रदिप पाटील

गणपूर जिल्हा. जळगाव

मो. 9922239055


Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे