भरलाय घडा क्र. 4✍️
भरलाय घडा क्र. 4
लावणी माझी
सख्या भरलाय माझा घडा
आस्वाद घेणार का
सुंदर रूपाचा माल माझा सख्या
तु जरा चाखणार का.
डोक्यावरी पडलीय जरी टक्कल
तरी मला सख्या तुमी तरुण भासले
सोडा जरा तेल तुमच्या टकली वर
बघा कशी उन्हात चकाकतेय.
पाहुन तुमच्या टकली ला
डोळे माझे दिपले
सख्या खोळ तूझ्या कडून भरायचीय रं सख्या सांग ना भरणार का.
माळलाय तूझ्या साठी गजरा
लोकांच्या बघा हो कश्या नजरा
तुमी मला आवडला सुंदर तुमचा चेहरा
करू आपण मिठीत आनंद साजरा.
सैल नको सोडु सख्या मिठी
बनलीय मी तूझ्या साठी
जरी मी तरुणी ताठी
आवडली मला तुझी काठी
जरी आली तुला साठी.
ऊब तुझी मनाला सुखावतेय
सख्या सोडु नको मिठी
अशीच राहूदे साथ आपुली
गुमफली माळ गजऱ्याची
तशीच आपली राहु दे.
सख्या भरलाय माझा घडा
आस्वाद घेणार का
सुंदर रूपाचा माल माझा सख्या तु चाखणार का.
सांग ना सख्या चाखणार
घडी माळेची सोडणार का
सुगधं फुलाचा आस्वाद घेणार का
माळ माझी माळलेली विस्कटणार का सख्या विस्कटणार का.©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment