अवहेलना ✍️
!!अवहेलना !!
नका करू थट्टा, लावु नका बट्टा
कोण लावत जुगार, खेळतात सारी सट्टा
तुमची लॉटरी नाही का वरळी मटका
दाखवता श्रीमंतीचा झटका
बेवडा पितो म्हणे खुप सारी दारू
स्वतः वाईन व्हिस्की रम पिता चुरूचुरू
तुमची करते ते प्रेम, दुसऱ्याची सांगे लफडं
स्वतःचा तो तरुण, दुसऱ्याचा तो डफडं
स्वतः केलं शिष्टाचार दुसऱ्यानं केला तो भ्रष्टाचार
आपण खाल्लं म्हणे तो पाहुणचार
साम दाम दंड सत्ता उभारी सारी कुनीती
दुसरा करे तोच सांगे अरे अरे हि तर अनिती
पाषाण काळीज याचं दुसऱ्याला सांगे मेलं का तुझं
स्वतः समझे तत्वज्ञानी आयका सारं माझं. ©️®️
प्रदीप पाटील
गणपूर ता चोपडा
जिल्हा. जळगाव.

Comments
Post a Comment