रंगत नाही ✍️
!!रंगत नाही!!
लहानपणाची रंगत नाही
खेळ ते राहिलेचं नाही
सोई खुप झाल्या आता
पण मन कधी रमतचं नाही
गाडी रेल्वे विमान आलं
बैलगाडी ची मजाच नाही
मातीची घरं मातीच्या चुली
त्या जेवणाची मजाच नाही
पंगत आहे पण वाढपीच नाही
स्वयंपाक आहे पण रुचकर नाही
मान नाही की सन्मान नाही
लहान मोठं कोण जाणत नाही
घरं आहेत पण घरपण नाही
आजी आजोबा दिसतच नाही
कुटुंब आहे पण माणसं नाही
नातं आहे पण नातेवाईक नाही
आस्था आहे पण आस्थेवाईक नाही
गाव दिसतंय गावपण नाही
मदत आहे पण मदतीला नाही
काय करावं पूर्वीची रंगत नाही
प्रदिप पाटील
गणपूर जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

अतिशय सुंदर... आपले लेखण निरंतर चालू राहावे.. मनापासून शुभेच्छा
ReplyDelete