ब्रम्हांडाचा वाली ✍️
ब्रम्हांडाचा वाली
सखा तुच माझा! आहेस तु राजा!
नाही गाजावाजा! तुज ठाईं!!1!!
लीला ती अगाध! देतोस तु साथ!
करतोस मात! दृष्टा वर!!2!!
सदैव पाठीशी! सद जीव साठी!
नबोलता काठी! चालवतो!!3!!
वाली तुचं जिवा! अंतरंगी ठेवा!
मुखी नाम देवा! जीवनात!!4!!
नाम घेतो मुखी! ठेव सदा सुखी!
नको करू दुःखी! जगतांना!!5!!
ब्रह्मांडाचा वाली!तुला मी शरण!
बांधत तोरण! नाद ब्रम्ह!!6!!
गातो गाणं तुझं! भर आता मन!
कर समाधान! प्रदिप चे!!7!!©️®️
प्रदिप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment