राजा पंढरीचा ✍️
!!राजा पंढरीचा!!
भक्त हो भक्तीत! दाखवतं शक्ति!
थोडी हो विरक्ती ! संसाराची!
राज दरबारी! गजर नामाचा!
खेळ आनंदाचा! स्मरणात!!
सुख शांती मिळो! सेवा त्याची घडो!
समृद्धी हो वाढो! नामातून!!
ध्यास आस तीच ! कृपाळु मनाची!
जनता हो त्याची! वारकरी!!
टाळ वीणा ओवी ! अभंग गातात!
चालत जातात ! वाटेवरी!!
सोहळा देखणा ! चंद्रभागे तीरी!
उभा तो मंदिरी! पंढरीत!!
देत हो दर्शन ! सोडवे त्या व्यथा!
सांगु काय कथा! विठ्ठलाच्या!!
राजा करे सुखी! नाम मुखी सदा!
भोळे कृष्ण राधा ! दरबार!!
लक्षात ठेवतं ! भक्ती मानवाची!
कथा हो मनाची! प्रदिपची!!©️®️
प्रदीप पाटील
गणपूर ता चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment