शेतकरी मारायचं धोरण ✍️
शेतकरी मारायचं धोरण अन पुढारी व्यापाऱ्यांच्या घरी तोरण.
आज आपणास शेतकरी यांना मिळणारे बी बियाणे खतं, आणि कीटकनाशक औषधं यात होणारी भेसळ आणि भरमसाठ वाढीव किंमत करून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक होताना दिसते. जनतेला लागणारे जीवन जगण्या साठी ज्यास जनता अन्नदाता म्हणतात तो महत्वाचा घटक शेतकरी. अन्नदाता व्यापारी वर्गाकडून लुटला जातोय सरकार धोरण त्यास लुटीसाठी खतपाणी घालून अजून लुटा असा संदेश देतं असते असं वाटतं आणि आपली तुंबडी व्यापारी सोबत भरत असली पाहिजेत. पूर्वी शेती उत्पादन कमी होतं. एका दाण्याचे शंभर दाणे पिकायचे. तेव्हा शेतकऱ्यांना किंमत होती. व्यापारी आणि सरकार तेव्हा पण शेतकऱ्यांना लुटायचे. लोकांना खाण्यासाठी अन्न कमी पडायचं. म्हणून शेतकऱ्या कडून सरकार लेव्ही धोरण राबवत. जबरदस्तीने धान्य वसूल करतं असे आणि गरीब जनतेला वाटतं असे. शेतीवर अवलंबून सरकार आणि व्यापारी जनता होती. एक एक दाणा पिकवण्या साठी शेतकरी झटत होता. तो पिकवलेला दाण्यासाठी शेतकरी कडून फुकट किंवा कमी किमतीत कसा मिळेल असं सरकार अन व्यापारी बघतं होता. नव्हे लुटत होता. तत कालीन सरकार लुटत होते. अगदी त्याहून जास्त प्रमाणात जास्त आज शेतकरी विरोधी सरकार आजपण लूटतय. शेतकऱ्यांच्या पत्नीला "लाडकी बहीण " योजनेचे पंद्राशे रुपये देताय आणि त्याचं शेतकऱ्यांना पाचशे रुपये देतात
म्हणजेच आपल्या बहिणीची किंमत करतोय असं नुसतं नावाला दाखवायचं आणि पायदळी तुडवायचं धोरण हे सरकारचं आहे.
बरं इकडचे असो तिकडचे स्वतःला लोकसेवक म्हणवणारे एकजात सारे. निवडणूक काळात. कर्ज माफी देऊ या विषयी एक बोलतं नाही. काम झालं आता लाथा मारायला कमी करणार नाही असंच दिसतं असो.
आज कापुस, ऊस, गहु, हरभरा, ज्वारी, बाजरी,मका, सोयाबीन, भुईमूग, तूर, मूग ईतर सर्व कडधान्य, सर्व डाळी सर्व फळं भाजीपाला यांची किंमत खुप कमी आहे. सर्व जनतेला कमी किमतीत शेतकऱ्यांचा माल हवा. व्यापारी आणि सरकार ला त्याहून कमी भावात शेतमाल हवा. शेतकऱ्यांना लुटून जनतेला पोसायचं. स्वतंत्र पूर्वी राजे, महाराजे,त्या पूर्वी असणाऱ्या जनतेवर राज्य करणाऱ्या टोळ्या ह्या सुद्धा शेतकऱ्यांना किंमत देतं असतं. वेळ प्रसंगी शेतकरी सांगेल तसं ते वागत असतं. कारण अन्नधान्य याची असणारी किंमत. धान्य वर आधारित काही ठिकाणी व्यवहार सुद्धा चालतं असतं. धान्य देऊन शेतजमिनी सुद्धा देऊन टाकत असतं. उत्तम शेती,मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी म्हटलं जायचं इतकी धान्य पिकवणाऱ्यांची ची किंमत होती.तद नंन्तर च्या स्वतंत्र पूर्वी काळ नंन्तर सुद्धा कापुस या पिकाला पांढरं सोनं म्हटलं जायचं. कारण कापुस पिकाला जी किंमत असे तीच किंमत सोन्याला होती. एक क्विंट्टल कापसात एक तोळा सोनं यायचं असं म्हटलं जातं. आज सोनं साधारण पंच्यायशी हजार रुपये आहे आणि कापुस अजून पाच ते सात हजार वर आहे. याचाच अर्थ शेतीमाल किती कवडीमोल सरकार व्यापारी खरेदी करतं. आज जर कापसाला पंच्यायशी हजार रुपये असता. तर आज हेच सरकार व्यापारी शेतकऱ्यांच्या पायाशी असतं. पण स्वतंत्र नंन्तर शेतकरी मारून खाणारे जनसेवक तयार झाले. आणि "शेतकरी फासावर जातोय व्यापारी सरकार ढगावर फिरतोय " जनतेचे सेवक सालदार यांनी मालक बनून व्यापारी सोबत घेऊन शेतकरी यांना लुटायचं धोरण अवलंबलंय असंच. सरकार ने शेती उत्पादन कमी येतेय म्हणून शेतकरी यांची देशात असलेली मकत्तेदारी मोडीत काढण्यासाठी हरित क्रांती हे गोंडस नाव देऊन. बी बियाणे, रासायनिक खते, फवारणी करा किंवा मरा याच साठी कीटकनाशक म्हणून औषधं, धोरण राबवलं आणि हळूहळू हळूहळू शेतकरी उत्पादन वाढवून त्याला नागवलं त्याची किंमत कमी केली. आज जगभरात शेतीमाल किंमत कमी आणि ईतर व्यपाऱ्यांच्या वस्तु भाव भरमसाठ हेच सरकारी धोरण. लुटा तोडा फोडा रक्त शोषण करा आणि याला फक्त पिकवायला लावा आणि मारा. बस इतकंच आजच्या राजकारणी लोकांचं धोरण दिसतं. आपण पाहिलं की सरकारने शेतकऱ्यांच्या पिकाच्या उत्पादन वाढवण्यासाठी त्याचं अगोदर कंबर्ड मोडण्या साठी धोरण अवलंबलं. उत्पादन वाढलं आणि शेतकरी यांची किंमत कमी केली. भारत देश अन्नधान्य निर्यात करणारा देश झाला. जर शेतीमाल जर ईतर देशात विक्री साठी जातं असतील तर शेतकरी भारतात सुखी पाहिजे होता ना पण तसं नाही. त्याचा"शेतीमाल देशाबाहेर गेला पण तो पिकवणारा कर्जाचा विळख्यात खोल गेला". हेच सत्य आहे.याला कारणीभूत सरकारी धोरण हेच आहे. पिकवणारा मातीतचं आहे. पण आलेलं पीक त्यावर प्रक्रिया करून विकणारा हा मालामाल होतो. अनेक उदाहरण सांगता येतील. शेती मालाची किंमत सरकार खुप अल्प दर ठरवते. तेच व्यापाऱ्या कडे गेलं की मालाची किंमत कैक पटीने वाढवते. असंच शेतकरी विरोधी धोरण सरकारी आहे. शेतकरी राजा च्या गावागावातील व्यथा खुप आहेत.असो यावर खुप बोलण्या सारखं आहे. तूर्त इतकंच. तरी सरकार ने शेतमालाला हमीभाव अजून दुप्पट वाढवु सांगितला होता. दुपट्ट झाला नाही ईतर वस्तु किंमती जश्या दहा पट वाढल्या तश्या आज ज्या शेतमालाला किंमती ह्या दहा पटीने वाढवल्या गेल्या तरच शेतकरी सुखी होईल नाहीतर फास हा आहेच त्याच्या पाचवीला सरकार ने पूजलेला. असो सरकार ला सद्बुद्धी येवो आणि आज ज्या हमीभाव किंमत आहे त्याच्या निदान पाच सहा पट तरी वाढ करावी अशीच शेतकरी म्हणून अपेक्षा करतो.
मारायचं धोरण थांबवावं जगवायचं धोरण स्वीकारावं. दिवाळीच्या सर्व अन्नदाता शेतकरी बांधवाना आणि जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो. लेख पर्व तूर्त येथेच संपवतो.©️®️
प्रदिप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment