सण गुढीपाडव्याचा ✍️रचना
!!सण गुढीपाडव्याचा!!
नवं सारं सुरु! सृष्टी बोध घेतं!
बीज वाण देत! मोहरात!!1
निर्मिती होण्यास! सुरवात हिच!
उत्पती हि तीच! साठवून !!2
सुरवात सारी! करी शेतकरी!
रान करे भारी! मशागती!!3
ठेकळ फोडतं!फूडपं काढत!
बीज वाळवत! सुरवात!!4
पुजन कुदळ! फोडून नारळ!
सकल्प निर्मळ! चैतन्याचा!!5
शेणाचा तो सडा! टाकून रांगोळी!
पुरणाची पोळी! जेवणात!!6
दारास तोरण!उभारत गुढी!
सजवत माडी! सणा साठी!!7
कडु गोड सण! भरे सारं मन!
सारं सृष्टी धन ! पाडव्याचा!!8
शुभेच्छा देतोय ! अभंग रचना!!
निर्मळ सांगणं ! प्रदिप चं!!9 ©️®️
प्रदिप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment