देव्हारा (अभंग) ✍️
!!देव्हारा!!
कुलदेवी असे ! ब्रम्हा विष्णु दिसें!
भोलेबाबा हसे ! देव घरा!!1!!
राधा कृष्ण जोडी ! गुरुदत्त शिव !
मूर्ती त्या भरीव! देव्हाऱ्यात!!2!!
दैवत पुजन! करतं भजन!
नित्याचं वदन! कुटूंबाचे!!3!!
सकाळ संध्याला! दिवा जोत लावी!
साऱ्यांना बोलवी! आरतीला!!4!!
नित्य होई पूजा! दुर्गुण ते पळे !
सुख शांती मिळे ! समाधान!!5!!
देव्हारा घरात ! लक्ष्मीचं दारात!
ताब्याची परात! देव धुण्या!!6!!
करपुर लावे! देवाला आवडे!
दीप जोत जळे! सांज वेळी!!7!!
प्रदिप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment