देव देव्हारा ✍️
देव्हारा
देव देव्हाऱ्यात नाही रं नाही रं
अंतरंगात त्याला पाहु रं पाहु रं!!
माणसा माणसात वसतो बघु त्याला रं त्याला रं
दीन दुःखी यांचं दुःख जाणु रं जाणु रं
सुख दुःखात मदत देऊन पाहा रं पाहा रं
देव मना मनात भरा रं भरा
जळी स्थळी वसतो सोबत असतोचं तोच रं तोच रं
कर्म धर्म सारं वर्म जाणतो तोच रं तोच रं
निर्गुण निराकार तोच गुण तोच भाव सार
मंदिर, मस्जिद,चर्च, देव्हारा अरे सृष्टी निर्मित्याला असा कसा कोंडता रं कोंडता रं ©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment