तुची गुलाब मोगरा ✍️
तुची गुलाब मोगरा, जीव तुझ्यात रंगला
सुगन्ध दरवळला, मनात माझ्या रुजला!! ध्रु!!
जीवनाच्या वाटेवरी, भेट आपली अवेळी
नातं रुजलं फुललं, सारं सारं सांजवेळी
मंदिरात होई पूजा, नाद तुझाचं लागला
रूपाने झाली हो वेडी, डोळे तुझेच राखाडी .
1
स्वास झाले एकरूप,सुटलं सुगन्ध धुप
उमललं फुलं मनी, चौखूरचं उधळूनी
मद धुंद तु चाखलं,आलं पराग कणात
बागेत फुल फुललं, सजली गजरा माळुनी
2
साज डोरलं पैंजण, अलंकार चढवले
डोळ्यात तुला भरले, राणी तुझीच जाहली
नेतोय कधी महाली, रात्र धुंदीत हो आली
शुंगार सजे मेहंदी , समरस तुझ्या झाली.
3
प्रदीप पाटील
गणपूर जळगाव

Comments
Post a Comment