नेसले मी नऊवारी ✍️लावणी 2
नेसले मी नऊवारी
नऊ रत्नाची खाण मी नेसली नऊवारी
नऊ गुणांची जाण येता ना राया घरी
आहे मला अभिमान, तुमीच मित्र वाटता मला छान
तुमच्या साठी नवी कोरी घातली नऊवारी
आज मोडा घडी झाली हो पार वेडी
तुमची लांब माडी नजर तिजवर जडी
आस लागली भेटायची आता सख्या राहवत नाही
कधी उघडेल खिडकी तुमची मी डोळे फाडत राही
जरा जपून चालवा नजरेचा तिर
मन करतेय मी जरा खंभीर
अलगद या सुगन्ध घेण्या मोगऱ्याचा
धागा हळुवार तोडा ह्या माझ्या गजऱ्याचा
नका लावु जोर नवा धागा आहे कमजोर
मनात तुमच्या राया चोर मन माजलैय घनघोर
नका करू शोर जपून मोडूयात घडी नेसले मी नऊवारी
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055
Comments
Post a Comment