नवदुर्गा ✍️
नवदुर्गा
आई माय माँ माऊली
वसुंधरा ती धरणी
नवं निर्माण कारिणी
प्रतिभा मान देईणी.
स्वयंभु मां अंतर्यामी
सौदंर्य रूप धारिणी
शक्ति भोळ्या त्या शिवाची
चैतन्य ऊर्जा वाहिणी.
स्तोत्र शक्ति नर रक्षी
इतिहास देई साक्षी
देव जाई शरणात
मारते वृत्ती राक्षसी.
मोहिनी कामिनी ऊर्जा
मदन राजाचं सर्जा
रंभा उर्वशी ते परी
भागवते साऱ्या गर्जा.
साज शुंगार लावंण्य
रंग ढंग करी संग
जाणी निर्मिती प्रसंग
रूप उधळणं रंग.
कर्ता करवीती देवी
अस्त्र शस्र शास्र जाणी
कलाकार संपन्नता
गुण उजळे दीव्यांनी.
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055
Comments
Post a Comment