तुझ्या प्रेमात वेडी राधा ✍️
!!तुझ्या प्रेमात वेडी राधा!!
तुझ्या प्रेमात वेडी झाली राधा
असा कसा देव तु आहेस साधा
कसा केला तु राधेला प्रेम वादा
तुझी रुक्मिणी असतांना मादा
प्रेम दिवानी केली तुच राधा
मुखी नाम घेतेस तुझंच सदा
हृदयात भरलाय तिनं प्रेम भाव
गळ्यात तुज नामाची साखळी राव
सखा तुच तिचा जुळवला ढाचा
सोबती खरा तुच एकरूप साचा
तु झालास भोगून भ्रम्हचारी
ती झाली तल्लीन सदाविचारी
असा कसा कृष्ण तु रे सखा
वैरागी केलं राधेला होऊन मुका©️®️
प्रदीप पाटील
गणपूर जिल्हा. जळगाव
मो. 9922239055


Comments
Post a Comment