नारी ✍️
!! नारी!!
नराची तु नारी! दृष्ट्रावर भारी!
दृष्ट तीच मारी ! शक्ति रूप!!1!!
कष्ट खुप करी! भरली संस्कृती!
स्वच्छ नीती कृती! सदाचारी!!2!!
सोबत सदैव ! देतात त्या साथ!
ठेवतं हृदयात! सोबतीला!!3!!
निर्माण निर्मिती! तीचं गर्भधारी!
सोशिक संसारी! अर्धांगिनी!!4!!
रक्त आटवून! स्थन पान देई!
बाळ खुश होई ! पदरात!!5!!
रूप तुझे खुप! हाती घेत सुप!
अन्न दे स्वरूप! भाकरीत!!6!!
प्रदीप सांगतो! नारी तुझी गाथा!
टेकवत माथा! निर्मितीला!!7!!©️®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055
Comments
Post a Comment