समाधान ✍️
" समाधान "
चित्त मन समाधानी असलं की समाधान जीवाला मिळतं. अज्ञानामुळे आपले मन विनाकारण दु:खात इकडे तिकडे भटकत राहते. कारण आपल्याला आपले खरे गंतव्य माहित नसते.कुठं पर्यंत आपला थांबा आहे.तर परम त्या सुखाचा उगम आपल्यातच असतो. म्हणून आनंद आणि समाधानासाठी. आपल्या अविनाशी अस्तित्वाला. म्हणजे स्वतःला ओळखा.स्वतःला ओळखलं पाहिजे माणसाने.तेच आपल्याला ओळखता येतं नाही. पहिले आपण कोण आहोत. काय करतोय, कसं जगतोय, कसं वागतोय, चार लोकं काय म्हणतं असतील. अशी अंनत प्रश्न घेऊन आपण जगत असतो. तेच प्रश्न मनात ठेवून.जगत असतो समाजात वावरत असतो. पण अंतरंगात समाधान हवं. म्हणून त्या साठी शुद्ध शांत मन ठेवतं. भगवंताचे नामस्मरण घेतलं तेच मोक्षाचे साधन आहे.पण आपण करतो का तर त्याचं उत्तर नाही? अन संसार रुपी आयुष्यात गुरफटलेला आपला जीव. असं ध्यान लावु शकतं नाही. ध्यानस्त असणं म्हणजे स्वतःचे शाश्वत रूप विसरणे हेच दु:खाचे मूळ आहे. पण आपण तसं करू शकतं नाही म्हणून दुःख घालवण्याचं साधन आपलं ते समाधान. संपूर्ण दृश्य जग हे सतत बदलत असते, सांसारिक सुख क्षणिक असते. वस्तू, प्राणी, निर्जीव आणि सजीव सर्व काही क्षणोक्षणी बदलत असतं. अशा स्थितीत विवेकबुद्धीच माणसाला मदत करते. विवेकबुद्धीच योग्य दृष्टी प्रदान करण्यास सक्षम आहे. जिथे विश्वास आहे तिथे मार्ग आहे. देवावरील पूर्ण श्रद्धा आपल्याला नैराश्यापासून वाचवते. सत्य संस्कार, धर्म तत्त्वज्ञान आत्म्याला सुख आणि उन्नतीच्या मार्गावर नेण्याचा मार्ग दाखवते. मानवाला दुःखातून मुक्त करण्यासाठी संस्कृती संस्कार तत्त्वज्ञानाचा उदय झाला असं वाटतं . दु:खात बुडलेली व्यक्ती जीवनातील आनंदापासून वंचित राहते हे सर्वज्ञात सत्य आहे. जेव्हा हे दु:ख आत्म्याच्या खोलात बुडते तेव्हा माणूस नैराश्यात जातो. अमूल मानवी रूपात सापडला अशा अर्थहीन अंतापासून जीवनाचे रक्षण करणे म्हणजे अध्यात्म अध्यात्मिक तत्त्वज्ञान संकल्पना. सत्याचा स्वीकार आणि असत्याचा त्याग करण्याच्या भावनेने सर्व धर्मांचा समन्वय हाच मानवाच्या सुखी जीवनाचा आणि विश्वशांतीचा आधार बनू शकतो. मन, बुद्धी आणि विचारांवर नियंत्रण ठेवूनच सुष्म म्हणजे ध्यान रूप साकारणे शक्य आहे. आपण आत्मनिरीक्षण केले पाहिजे, ज्याचे साधन म्हणजे श्रवण आणि ध्यान. स्वतःमधील खऱ्या, अविनाशी स्वरूपाचे ज्ञान. ध्यानस्थ होणं म्हणजे मनाचा विरोध करणे हा आहे.मनातील ईतर भावना काढून टाकून शुद्ध स्वरुपात मन चित्त पाहिजे. ध्यानाचे दोन पैलू आहेत, साधना आणि सिद्ध .आपण ध्यानस्थ होऊ शकतं नाहीत आणि सिद्ध होऊन सिद्धी प्राप्त करू शकतं नाहीत म्हणून आपल्या अंतःकरणात समाधान असणं त्यात मनानं आहे त्यात समाधानी असलेल्या आत्म्याचे चिंतन मनन आपण केले पाहिजे. मन, बुद्धी, शरीर, हे सर्व आपले शुद्ध स्वरूप नाही असं समजून घेऊ, ते आपल्याला येथे सृष्टीत आहोत तोपर्यंत मिळालेलं वापरण्या साठी साधन मिळालं आहे असंच मानु.ज्याद्वारे आपण कार्य करतो.परंतु आपले शुद्ध स्वरूप आत्मा आहे, जे देवाचे शाश्वत रूप आहे असं मानतात नव्हे आहेच. आत्म्याचे मूळ रूप ब्रह्म आहे, या ब्रह्माला ओळखण्यासाठी संयमाची गरज आहे. आचार, विचार आणि वर्तन यावर नियंत्रण ठेवून मनाला खऱ्या आत्म्यात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकदा का मन स्थिर झाले की इतर कोणताही विचार राहत नाही. मन आणि विचारांच्या स्थिरतेची गरज अधोरेखित करून माणसाच्या मनावर आणि विचारांवर नियंत्रण असायला हवे, असे संतांनी सांगितले. आपण आपले मन शुद्ध करून आत दडलेले स्वस्वरूप पहावे. जेव्हा पाच इंद्रिये आणि बुद्धी स्थिर होतात तेव्हा ही अंतिम अवस्था असते. ज्याने ही अवस्था प्राप्त केली त्याला "सिद्ध पुरुष " म्हणतात. जो या ज्ञानाने तृप्त होतो त्याला दुसरी इच्छा उरलेली नाही. म्हणजेच तो समाधानी झाला. शेवटी काय तर समाधान हेच मूळ स्वरूप आत्म्याचं असतं असंच. म्हणून जीव आहे तोवर करून घेऊ. पण करता करता आहे त्यात समाधान मानून घेणं हेच जिवा जीवनाचं अंतिम सुख शांती मिळण्याचं सत्य साधन आहे. धन लक्ष्मी, संम्पत्ती शाश्वत आहे पण टिकेल ही शाश्वती नाही. अंनत राजे महाराजे. देव दानव आलेत. गेलेत मूळ स्वरूप कोणतंच टिकतं नाही सृष्टी नियम बदल घडणं. सातत्याने फिरणं फिरतं राहणं. असंच आहे. आपण त्यात एक सुष्म किड्या प्रमाणे आहोत. भ्रम्हांड आपण बघु शकतं नाही.आपण ज्या सौर मालेत जन्मलो ती बघु शकतं नाहीत. मी तर म्हणतो आपण ज्या जिल्यात, राज्यात, देशात जन्मलो तो पण आपण संपुर्ण बघु शकतं नाही. त्याचं संपुर्ण भ्रमण सुद्धा आपल्या जिवा कडून होऊ शकतं नाही. कितीही फिरलं तर पूर्ण बघणं शक्य नाही. मग तो माणुस जीव कोणताही कितीही मोठा असो.म्हणजे देवाने जे डबकं दिलं आपल्याला. जिथं जन्मलो तेथेच विरून जायचंय.मातीच्या मडक्या सारखं. हा देह मातीचा नाही तर मातीतुन पेशी धारण करतं. नर मादी सहयोगातून अवंतरलेलं सुष्म स्वरूप मधून पेशीचा समूह हा एक दिवस पेशी समूह संपला की देह रूप अस्तित्व संपलं.म्हणून आहे तोवर शुद्ध चित्त ठेवून. शांत अंतर्मन ठेवतं शांतीत जगणं म्हणजे समाधान. चला तर ""चित्त असावं समाधान हिच सुख सुखी जीवनाची खाण "" ही प्रदिपची म्हणं रुजवत आनंद मानु आनंदी जीवन जगु. हिंदी मधे एक गाणं आहे." दुनिया मे कितना गम है मेरा गम कितना कम है. आपलं इतरांच्या पेक्षा दुःख कमी आहे. हेच सत्य मानु. समाधान सत्व जाणु. लिहण्या सारखं खुप आहे. ध्यानस्थ बसु शकतं नाही पण समाधान मानून समाधानी राहु शकतो जीव हेच सत्य सांगतोय.©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर. ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment