नेसले मी नऊवारी ✍️लावणी 1
नेसले मी नऊवारी
आज तुमच्या साठी नेसली मी नऊवारी
साडी माझी भरजरी येणार ना सांगा घरी
नथ माझी सोन्याची, राणी तुमच्या मनाची
तिरीप पडलीय उन्हाची, सखी मी हो तुमची
वाट पाहतेय राणी तुमची, वेणी गुंफली गजऱ्याची
सुगधं सुटलाय गजऱ्याचा,फुलराणी तुझ्या भुंग्याची.
मर्द भासला गडी गाली पडली खळी
बघताच झाली वेडी खुळी या ना खेळू झिम्मा फुगडी
अलगद खेळ खेळू, होईल साडी चोळामोळा
ह्या गळ्यात तुम्ही हो, सोनसाखळीचा मणी अलगद पोळा.
नाजुक मी अजून, पोळी नका घेऊ भाजून
सारं चाललंय चोरून, येता तुम्ही दुरून
म्हणून सजलीय आज, मोडली आज साडीची घडी
तुमच्या साठी होतेय वेडी, नाजुक मी हो भोळी.
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा.
जिल्हा. जळगाव
Comments
Post a Comment