नारी घे तु भरारी ✍️
नारी घे तु भरारी
नारी घे तु उंच भरारी
आहेस तुचं हो करारी
संस्कार शिकवते भारी
घराची तुच कारभारी.
संस्कृती रक्षण करती
गाजवली तुच धरती
झेप घेते आकाशावर्ती
वैमानिक उडे वरती.
पहिली तुचं राज्य कर्ती
राणी संशोधक शेतीची
परीक्षण बीज माती ची
रक्षिती सृष्टीची नराची.
शिकार ठरली मनुची
बदलली भाषा धर्माची
तोड आता बंधन त्याची
भीती तुला आता कोणाची.
सर्व क्षेत्रात कामगिरी
गाजवते तुच गं भारी
सांभाळते जबाबदारी
नरा पेक्षा सरस सारी.
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055
Comments
Post a Comment