दिव्य शक्ति ✍️
!!दिव्य शक्ति!!
युगे युगे तुझी शक्ति दिव्य गाथा
रुपाला टेकवतात सारी माथा
आई भवानी रूप स्वरूप मायेचं
साज शुंगार देखणं भाव दान देण्याचं
काली दुर्गा माता रूप क्रोध्दाचे
मान छाटी दृष्ट पापी योद्धाचे
निर्माण निर्मिती कर्ती धरती
दिव्य शक्ति दिसता दृष्ट मरती
आदिमाया तुच राज्यकर्ती
जीव जीवन सारे जगती
नवंरात्री दिप प्रज्वलीत होती
उजळती जळती अखंड जोती
प्रकाश आनंद पर्व चौफेर
नाचत खेळत संग धरे घेर. ©️®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055
Comments
Post a Comment