कन्या ✍️

 कन्या 


 सोनं पावलांनी! येई पोटी मातें!

जोडी सारी नाते! कन्यारत्न!!


बहीण भावाची! मुलगी आईची!

लेक ती बापाची! उद्धारते !!


असते गुणाची! येतेय सणाची!

पाहुणी घरची! माहेरात!!


दुःख जाणे सारं! उचलतं भार!

करतं संसार! दोनघरी!!


लक्ष्मी सरस्वती! कन्या हिच माती!

उगवते नीती! संस्कारात!!


भाग्य उजळत! येते तीच दारी!

बने कारभारी! गृहलक्ष्मी!!


वर्णन करतो! प्रदीप कन्येचं!

लिहतं मनाचं! अभंगात!!


प्रदीप मनोहर पाटील

गणपूर जळगाव

मो. 9922239055

Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे