स्त्री शक्ति ✍️1

 स्त्रीशक्ती 


कारभारी ती नराची 

सर्व गुणांनी सपन्न 

स्वच्छ ठेवी तीच घर

सांभाळी सारं उत्पन्न.


विश्वाची तीच माय

उदय उत्पती सर्व

लेकराची रक्षितिच

सुखदाती नवं पर्व.


अष्टभुजा रूप धारी

भगवती सरस्वती 

मांगल्य ती मूर्ती भासे

भोळ्याची तीचं पार्वती.


धैर्यवती क्रोधावती

दृष्टानां वाटते भीती

सुजणांची माऊली तु

जोडते सारीचं नाती.


कणाकणात वसते

विद्या लक्ष्मी दिसते

गर्भ नवं रुजवते  

शोषिक हिच असते.


प्रदीप पाटील 

गणपूर ता. चोपडा

जिल्हा. जळगाव

मो. 9922239055



Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे