लावणी ✍️कविता
लावणी
नटरंगी नार करे शुंगार
घालतं पैंजण करतं वार
भरत गावात ती दरबार
डोळ्यानं करते मादक वार.
नाचत मुरडत तालावर
हासणे खुलवत गालावर
तीळ खुणावत हृदयावर
वेडावे बघून लहान थोर.
गाणं म्हणतात रात्रभर
नाचते घुंगरूच्या तालावर
करते घाव तीच मनावर
सूर कोकीळ गाणं मुखावर.
चांदण्या रात्रीत धरते ठेका
तरुण मनाला देतेस झोका
पाहुन मोकार मारते चौका
धुंदीत आणते साऱ्याच लोका.
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055
Comments
Post a Comment