मन ✍️

| | मन | |


मेदू करतो विचार 
मन टाकतं आचार 
करतं सदाचार दुराचार 
भ्रष्टाचार सत्य अंगीकार...

आनंदात डोळ्यात धार 
दुःखात तीक्ष्ण मार 
भटकंती भ्रम्हांडी फार 
क्षणात पाताळ पार...

स्थिर स्थावर नसतं 
म्हणून कधी फसतं
चांदण्या पाहणं सोडून 
अंधार शोधतांना दिसतं...

प्रेमळ सोज्वळ विचार 
दृष्ट भ्रष्ट आचार 
तळ न लागे पार 
 सोडू नये सदाचार... 

कोणाच कसं चाले 
कोण कुठं डुले 
फुल आनंदी फुले 
मन मात्र डोले... 




प्रदीप मनोहर पाटील 
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव ©®

Comments

  1. मन प्रसन्न करणारी कविता. आधी मन करा रे प्रसन्न I सर्व सिद्धीचे कारण II

    ReplyDelete
  2. मन प्रफुल्लित करणारी छान

    ReplyDelete
  3. खूप खूप छान

    ReplyDelete
  4. मन 👌 अप्रतिम

    ReplyDelete
  5. खूपच छान

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे