मन ✍️
| | मन | |
मेदू करतो विचार
मन टाकतं आचार
करतं सदाचार दुराचार
भ्रष्टाचार सत्य अंगीकार...
आनंदात डोळ्यात धार
दुःखात तीक्ष्ण मार
भटकंती भ्रम्हांडी फार
क्षणात पाताळ पार...
स्थिर स्थावर नसतं
म्हणून कधी फसतं
चांदण्या पाहणं सोडून
अंधार शोधतांना दिसतं...
म्हणून कधी फसतं
चांदण्या पाहणं सोडून
अंधार शोधतांना दिसतं...
प्रेमळ सोज्वळ विचार
दृष्ट भ्रष्ट आचार
तळ न लागे पार
सोडू नये सदाचार...
कोणाच कसं चाले
कोण कुठं डुले
फुल आनंदी फुले
मन मात्र डोले...
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव ©®

मन प्रसन्न करणारी कविता. आधी मन करा रे प्रसन्न I सर्व सिद्धीचे कारण II
ReplyDeleteमन प्रफुल्लित करणारी छान
ReplyDeleteखूप खूप छान
ReplyDeleteमन 👌 अप्रतिम
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteखूपच छान
ReplyDelete