आद्याक्षरी काव्य
| | आद्याक्षरी काव्य | |
श्री प्रदिप मनोहर पाटील
श्री. श्रीमंत असावे मनी
प्र. प्रसार व्हावा त्रिभुवनी
दि. लावून दिप मनी
प. पसरु दे कीर्ती जनी
म. महत्ता सुबत्ता बापावानी
नो. नोबत झडू दे अंगणी
ह. हरहर महादेव म्हणुनी
र. रवीचं तेज साठवुनी
पा. पाहू स्वप्न जीवनी
टि. टीम टीम प्रकाश महालातूनी
ल. लयलूट प्रकाशातुनि
ग. गंगा वाहे शेतातूनी
ण. णमन करतो वाकुनी
पु. पुर वोसंडे नदितुनी
र. रमलो तरी जाऊ जीवन सोडुनी.

Comments
Post a Comment