आषाढी एकादशी
| | आषाढी एकादशी | |
नाम घेतं विठ्ठलाचेवारी पोहोचते पंढरी
बाकी उपवास घरोघरी
पंचपक्वाण्य खाऊन करी..
वास जीवात तरी
करतात भेटण्या वारी
भक्ती पाहुनी मानवाची
पावतो विठ्ठल हरी..
तो उभा विटेवरी
पाहून हृदय भरी
बोध घ्या काहीतरी
दीनदुखी सेवा अंगिकारी..
येतो भेटाया दारी
कर्म हेचि पंढरी
नाम मुखी सदा
चित्त असावं सदाहरीहरी..
देव देव्हारा घरी
पूजा अर्चना सदाजोकरी
तीच रोजची वारी
दर्शन देतो हरी..
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा. जळगाव ©®

रामकृष्ण हरी
ReplyDelete