माँ जिजाऊ (क्र 2)✍️
| | माँ जिजाऊ | |
अवतार घेतला मातेने
क्षत्रीय कुळवन्त घराणे
उद्धार केला घराण्याचा
उठले माणुसकीचे तराणे.
भार्या शोभली शहाजीस
पोटी पुत्र जन्मला
रयतेचे राजे शिवाजी
पापींचा कहर संपला.
शिकवले पुत्रास दांडपट्टा
आईनं घोडेस्वारी केली
बालपणीच लढणे शिकवले
आक्रमण किल्ले कुलवन्ताने लढवली.
सदाचरण शिकवलं मायेनं
राज्य बनवले पुत्रानं
लढणे शिकवले जिद्धीनं
अटकेपार पसरवले हद्दीनं.
हिंदूंची लहर आली
मंदिरे जागरूक जाहली
बाराबलुतेदार हाती आली
बहुजनांनी साथ दिली.
आई झाली कुळवंतांची
माँ जिजाऊ शोभली राज्यांची
वर्णनास शब्द अपुरे पामराचे
माँ साहेब होऊन गेली सर्वांची.
प्रदीप पाटील
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव
©️®️
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव
©️®️

अति सुंदर
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद आभारी आहे आपला
Deleteछान खुपच छान
Delete