गरीब ✍️
!!गरिबी!!
कष्ट उचलतात भार
अंग सळपातळ फार
खाण्यास होई मारामार
दृष्ट करतात वार.
जगता जीवन लाचार
वर पाही आभाळ
छत नसे राहण्या
नको असा काळ.
नारी पसरे पदर
दृष्ट नजरांचा वार
नर उचले भार
देतात त्यालाचं मार .
जीव कुटूंबाचा कासावीस
अन्न वस्र निवारा
धर्तीवर संसार सारा
शासन करत्तांनो काहीतरी करा.©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055
Comments
Post a Comment