होळी ✍️

 होळी 


होळी रे होळी 

खाऊ पुरणाची पोळी 

जमवु सारे सवंगळी 

देतं साऱ्यांना आरोळी.


निसर्ग रंग उधळी

पळस फुलं फुलवी 

जुनं पान गळी 

 नवं पालवी पसरवी.


पशु पक्षी सारे 

उन्हात बांधी घरे 

रंग साऱ्यांचे वेगवेगळे 

जीव जीवन सारे.


आनंद मानवात शिरे 

दुःख सारं पळे 

अग्नी पेटे चौकात 

नाचत होई सोहळे.


पाणी वरती पळे 

ऊन जाई कोवळे 

तप्त सोनेरी पिवळे 

रंग उधळण चोहीकडे.©️®️


प्रदीप मनोहर पाटील 

गणपूर तालुका चोपडा 

जिल्हा. जळगाव 

मो. 9922239055



Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे