होळी ✍️
होळी
होळी सण थंडी जाऊन तप्त ऊन पडण्यास प्रारंभ होण्याचा सुरवातीचा काळ. थंड वातावरण जाऊन. उन्हाळा सुरवात आरंभ वेळ. होळी सण निमित्त अनेक कथा दंतकथा आहेत. त्यात आपल्याला पडायचं नाही. पण सणा विषयी माहिती जरूर घेऊ. पावसाळा नंन्तर मातीतील ओलाव्यात येणारी पिकं काढणी सुरवात होण्याचा काळ होळी. पेरलेली कणसं भरून गेलेली असतात. ज्वारी ,गहु, हरभरा ई सर्व पिकं यांची कापणी सुरवात होण्याचं पर्व नंन्तर उन्हाळा लागणार असतो. म्हणून पिकं चांगली येऊन साठवण करून आनंद साजरा करण्याची वेळ. वृक्ष्यांनी पण जुणी पालवी सोडुन नवं पालवी अंगिकारली असलेला काळ. आबे व तत्सम वृक्ष यांचा मोहर बहर येऊन गोड सुरवात होण्याचं पर्व. तसेच पशु पक्षी आपली आपली रानात. खोपा बनवण्याची सुरवात करून उन्हा पासून संरक्षण करण्यासाठी खोपा बनवून उन्हाळा पुढे चालून येणारा पावसाळा या मधील काळात जीव वाचवून दुसरा जीव वाढवून संगोपन करून पावसाळा टिपे पर्यंत काळजी घेत असतात. सारीकडं जीव सृष्टी चक्रात लगबघ सुरु असते. चिंच,बोरी, डांगर टरबूज काकडी गिलकी विविध हिवाळ्यात सुरवात होऊन येणारी फळं उन्हाळ्यात कामी पडण्या साठी असतात.तोच आनंद व्यक्त करण्यासाठीचा सण असंच मी म्हणेल. आता कामं सपंलीत वनराई ला नवा बहर आलाय. पळस फुलं उमलली तत सम ईतर रंग देणारी वृक्ष यांची फुलं रंगी बेरंगी फुलं फळं त्यांचा सुगन्ध. रंग गन्ध उधळण्या चा सण म्हणजे होळी पौर्णिमा. पळस सारखी वृक्ष सांगतात कुठं पण जा पळसाला पानं तीनच असतात.यावरून बोध घेत जावे आणि दुःख सारं विसरून नवं निर्मिती सुरवात सृष्टी सारखी करूयात. असाच आनंदी सण म्हणजे होळी. सृष्टी ने जो पालापाचोळा अंगावरून उतरवून टाकलाय तो काही प्रमाणात जाळुन टाकून उरलेली राख आणि उरलेला पालापाचोळा हा नवं सृष्टी नवं पावसाळ्यात उगवणारी नवं बीज साठी तरतूत करूयात असंच यातून संदेश मला वाटतो. त्यांच प्रमाणे मानवाने पण होळी पेटवून मुलं मुली यांची पसंती करून जोडया जमवून नवं दांपत्य सुरवात करण्यासाठी सोहळा यात्रा बाजार भरवला जातो असंच माझं प्रदिपचे मत. नवीन या सणात आदिवासी नव्हे पूर्वी सारी मानवजात हि पण आदिवासी वनवासीच होती.नर मादी नव्हे स्त्री पुरुष आवडीचे जोडीदार निवडून आनंद व्यक्त करतं नाचत गात पुढे लग्न सोहळा भरवत. तीच प्रथा होळी पर्वात सांगते. उन्हाळ्यात सारी कामं उरकवून घेऊ पावसाळ्यात फुरसत मिळणार नाही. म्हणून आनंदी आनंद साजरा करतं उत्सव मनवला जातो. वृक्ष जसं कात टाकून नवं सुरवात करतात अगदी तसंच मानवाने बोध घेऊन जुनं सोडतं नवं अंगीकारत रंग उधळत सण साजरा करतात. नवं निर्मिती ईतर वृक्ष पशु पक्षी प्राणी सारखीच मानवाने पण सुरवात करण्याचा काळ त्याची आरोळी ठोकत. नाचत बागडत खेळत उत्सव साजरा करतात. लोकं पूर्वापार करतं असली पाहिजेत. होळी विषयी थोडक्यात पण माझ्या आकलन शक्ति नुसार सुचलेलं वर्णन.©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर तालुका चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment