रंगून जाऊ रंगात ✍️

 रंगून जाऊ रंगात 


रंग लाल गुलाबी 

फुलं कुस्करून केसरी 

संग धरतं निसर्गाचा 

उधळण रंगांची सारी.


सका सोबती मैत्रिणी 

पती पत्नी गुणिजणी 

लहान थोर सारी 

खेळ खेळती अंगणी.


गुंज पक्ष्यांची रानी 

डरकाडी देतं प्राणी 

पाणी साठवण संदेश 

आरोळी हिच जीवनी.


सृष्टी सारी सजली 

धरणी थोडी भाजली 

आठवण ठेवु मनी 

संस्कृती साऱ्यात रुजली.


उंट साठवे अंगात 

वृक्ष साठवी पालवीत 

सांगणं मानवाला तेच 

पाणी साठवण धरणात.


सूर्य साठवे बांष्पात 

साठा सारा आकाशात 

रंग संग जीवनात 

तरी सारे आनंदात.©️®️


प्रदीप मनोहर पाटील 

गणपूर तां. चोपडा 

जिल्हा. जळगाव 

मो. 9922239055


Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे