विद्याधन ✍️
विद्याधन :-
मिळे विद्या शिकून
खुप पुस्तकं वाचुन
वाढे दुसर्यास सांगून
ठेवा असावा लिहून.
करू सतत वाचन
नित्य ठेवावं चिंतन
वाचुन असावं मनन
मिळे त्यातून सद्गुण.
पद प्रतिष्ठा विधेतून
संत सद्विचार अंगी
जीवन सुखी प्रसंगी
नीतिमत्ता शिक्षण सांगी.
कष्ट सेवा भाव
विद्या जीवन प्रभाव
अंधश्रद्धा काम क्रोध
विद्या जिथे अभाव.
ज्ञान धन सरस्वती
साधे त्यातुन प्रगती
जीव जीवन संमती
उच्च निर्माण नाती.©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर तालुका चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055
Comments
Post a Comment